वीर माता जिजाबाई भोसले उद्यान म्हणजेच राणी बाग (ranichi baug), राणी बाग हे दक्षिण मुंबईच्या भायखळा विभागात ६० एकरा मध्ये पसरलेले उद्यान आहे.या उद्यानाचे बांधकाम सण १८६१ रोजी करण्यात आले होते, तेव्हा या उद्यानास राणी व्हिक्टोरियाचे नाव देण्यात आले होते. कालांतराने भारत देश स्वतंत्र झाल्या नंतर अनेक सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्यांच्या प्रयत्नाने या उद्यानाचे नाव वीर माता जिजाबाई भोसले उद्यान असे करण्यात आले.
या उद्यानात ३०० हुन अधिक प्राणी आणि पक्षी आहेत. मगर,हत्ती,जिराफ,हरीण,वाघ,बिबट्या आणि अनेकांचे आकर्षण झालेल्या पेंगवीणचा ही त्यात समावेश आहे.
प्राणी आणि पक्षांसोबतच राणी बाग (ranichi baug) ५०० हुन अधिक झाडांच्या प्रजाती आणि ३००० हुन अधिक झाडांनी परिपूर्ण असल्या मुळे अनेक पर्यांवरण प्रेमींचे आवडते ठिकाण आहे.
राणी बाग वेळ | Rani Baug Timing
राणी बाग उद्यानाची दिवसानुसार वेळेची संपूर्ण माहिती.
दिवस (Day) | वेळ (Timing) |
सोमवार (Monday) | सकाळी ९ ते संध्याकाळी ५ (9 AM to 5 PM) |
मंगळवार (Tuesday) | सकाळी ९ ते संध्याकाळी ५ (9 AM to 5 PM) |
बुधवार (Wednesday) | बंद (Closed) |
गुरुवार (Thursday) | सकाळी ९ ते संध्याकाळी ५ (9 AM to 5 PM) |
शुक्रवार (Friday) | सकाळी ९ ते संध्याकाळी ५ (9 AM to 5 PM) |
शनिवार (Saturday) | सकाळी ९ ते संध्याकाळी ५ (9 AM to 5 PM) |
रविवार (Sunday) | सकाळी ९ ते संध्याकाळी ५ (9 AM to 5 PM) |
राणी बाग तिकीट | Rani Baug Ticket
राणी बागेत (ranichi baug) वयोनुसार प्रवेश शुल्क खालील प्रमाणे.
- ₹ १०० प्रौढ (Adult)
- ₹ १०० कुटुंबासाठी (पती पत्नी + दोन मुले (३ ते १२ वर्ष)
- ₹ २५ (३ – १२ वर्षाच्या मुलांकरिता.)
- ₹ १०० कॅमेरा शुल्क.
- ₹ ३०० विडिओ कॅमेरा
- ₹ ३०० प्रौढ – परदेशी पर्यटक
- ₹ २०० मुले – परदेशी पर्यटक
- ज्येष्ठ नागरिक व अपंगांसाठी प्रवेश मोफत.
- ₹ १५ खाजगी शाळेच्या विध्यार्थ्यांसाठी.
राणी बागेत पोहचण्याचा मार्ग | How to Reach Ranichi Baug
राणी बाग हे मुंबई शहराच्या मध्यवरती भागात आहे, इकडे येण्याचे तशे अनेक मार्ग आहेत पण सगळ्यात सोप्पा मार्ग हा रेल्वेचा आहे. भायखळा रेल्वे स्थानकाच्या पूर्वे पासून राणी बाग (rani baug) हाकेच्या अंतरावर आहे.
राणी बागे संबंधी पडणारे सामान्य प्रश्न | Rani Baug FAQs
१) राणी बागेत कशे पोहचायचे?
उत्तर.टॅक्सी, कॅब किंवा बेस्ट बस व रेल्वे ने तुम्ही राणी बागेत पोहचू शकता, भायखळा पूर्व रेल्वे स्थानका पासून राणी बाग ५-१० मिनिटाच्या अंतरावर आहे.
२) राणी बागेला भेट देण्यासाठी उत्तम वेळ कुठली?
उत्तर.राणे बागेत भेट देण्यासाठी दुपारी १२ ते ३ ची वेळ उत्तम आहे.
३) राणी बागेत कुठ-कुठल्या प्राण्यांचा समावेश आहे?
उत्तर.राणी बागेत वाघ, बिबट्या,मगर,पाणगेंडा,हत्ती अश्या अनेक प्राण्यांचा समावेश आहे.
आपल्याला जर राणीबागे बद्दल ची माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रां बरोबर नक्की शेयर करा.