राज भवन (Raj Bhavan Maharashtra) संपूर्ण माहिती 

महाराष्ट्र राज भवन (Maharashtra Raj Bhavan) हे महाराष्ट्राच्या राज्यपालांचे शासकीय निवासस्थान आहे, हे मुंबईतील मलबार हिल ठिकाणी ४४ एकर मध्ये पसरलेलं आहे. तिन्ही बाजूने समुद्र आणि निसर्गपूर्ण वातावरणात राज भवनाचे सौंदर्य अधिक उभारून येते.राज भवनामध्ये बरेच मौल्यवान चित्रे, कार्पेट, सुंदर कोरलेले दरवाजे, फ्रेंच शैलीच्या खुर्च्या, सोफा इत्यादी गोष्टींचा समावेश आहे. 

महामहिम राज्यपाल ह्यांचा सहमतीने राज भवन सर्व सामान्य लोकांसाठी व पर्यटकांसाठी खुले असते. तरी ज्यांच्या इतिहासाची आवड आहे व निसर्ग प्रेमी आहे तर तुम्ही राज भवनाला नक्की भेट दीली पाहिजे. 

महाराष्ट्र राज भवन वेळ माहिती | Maharashtra Raj Bhavan Visiting Timing

राज भवनला भेट देण्यासाठी सकाळी ६.१५ ते सकाळी ८ हे वेळ ठरवण्यात आलेली आहे. तरी राज भवन (Raj Bhawan) भेटी संबंधी सर्व माहिती खाली देण्यात आलेली आहे.

दिवस (Day)वेळ (Timing)
सोमवार (Monday) बंद (Closed)
मंगळवार (Tuesday)सकाळी ६.१५ ते सकाळी ८ (6.15 AM to 8 AM)
बुधवार (Wednesday)सकाळी ६.१५ ते सकाळी ८ (6.15 AM to 8 AM)
गुरुवार (Thursday)सकाळी ६.१५ ते सकाळी ८ (6.15 AM to 8 AM)
शुक्रवार (Friday)सकाळी ६.१५ ते सकाळी ८ (6.15 AM to 8 AM)
शनिवार (Saturday)सकाळी ६.१५ ते सकाळी ८ (6.15 AM to 8 AM)
रविवार (Sunday)सकाळी ६.१५ ते सकाळी ८ (6.15 AM to 8 AM)

राज भवन मुंबई तिकीट माहिती | Raj Bhavan Mumbai Tour Booking

राज भवनाला भेट देण्यासाठी आधी आपल्याला तिकीट बुक करावी लागते, आपण आपल्या सोईनुसार तिकीट बुक करू शकता. तिकीट बुकिंग आपल्याला राज भवनाच्या अधिकृत संकेतस्थाळावर जाऊन करायची आहे. 

 हे आहे राज भवनाचे अधिकृत संकेतस्थळ ➟  Click here.

महाराष्ट्र राज भवन तिकीट दर | Maharashtra Raj Bhavan Ticket Price

राज भवन भेटी साठी प्रति व्यक्ती रुपये.२५  (₹.25 Only) इतका दर आकारला जातो. 

राज भवन संपर्क क्रमांक | Raj Bhavan Contact Number

राज भवनला आपण खालील नंबर वर संपर्क साधू शकता.

फोन. 91-22-23632343

राज भवन पत्ता | Maharashtra Raj Bhavan Address

राज भवन, वाळकेश्वर रोड,  

मलबार हिल, मुंबई – ४०००३५.

राज भवनाला भेट देण्यापूर्वी काही महत्वाच्या सूचना | Things to Know Before Visiting Raj Bhavan

राज भवनाला भेट देणार असाल तर काही महत्वाच्या सूचना आहेत त्या नक्की पहा.

  • राज  भवनाला भेट देण्यासाठी तुम्ही कमीत कमी पाहीन भर आधी बुकिंग करा, जेणेकरून तुम्हाला राज  भवनाला भेट देण्यासाठी कुठलाच त्रास होणार नाही. 
  • राज भवन हे महाराष्ट्राच्या राज्यपालांचे अधिकृत निवास स्थान आहे तरी आपण तिथे जवाबदारी ने वागावे.
  • कॅमेरा व इतर उपकरणे राज भवनात घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे, आपण आत मोबाईल घेऊन जाऊ शकता त्यासाठी कुठलेच निर्बंध नाही आहे.
  • राज भवन मध्ये प्रवेशासाठी सोबत सरकारी ओळख पत्र घेऊन या

महाराष्ट्र राज भवना संबंधी पडणारे सामान्य प्रश्न |  FAQs on Maharashtra Raj Bhavan

१. राज भवनात कशे पोहचायचे?

उत्तर. राज भवन ला येण्यासाठी तुम्ही चरणी रोड रेल्वे स्थानकावर उतरून तिकडून टॅक्सी पकडून १०-१५ मिनिटात पोहचू शकता.

 २. राज भवनात भेट देण्यासाठी उत्तम वेळ कुठली?

उत्तर. राज भवनात भेट देण्यासाठी उत्तम वेळ सकाळी ६.१५ ते सकाळी ८ आहे, आपल्याला ह्या वेळेत सूर्योदय पाहायला ही भेटू शकतो. 

३. राज भवनात पाहण्यासारखे काय काय आहे?

उत्तर. राज भवन ४४ एकर मध्ये पसरलेले असून तिकडे ब्रिटिश कालीन बंकर, दरबार हॉल, साकली देवी मंदिर, महादेव मंदिर व आत असलेल्या हिरवळी मुळे मोर सुद्धा पाहण्यासाठी मोठे आकर्षण आहे.

आपल्याला जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रां बरोबर नक्की शेयर करा.

Leave a Comment